कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड येथे दिवाळीच्या मुहूर्तावर अडत दुकानात गुळाचे सौदे काढताना पदाधिकारी, संचालक. 
कोल्हापूर

Kolhapur Jaggery Market | गुळाचा ‘गोडवा’ वाढला; प्रतिक्विंटल निघाला ७,०११ रुपये मुहूर्ताचा सौदा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड येथे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बाबूराव अतितकर यांच्या अडत दुकानात गुळाचे सौदे काढण्यात आले. मुहूर्ताच्या सौद्यात तळाशी येथील शेतकरी लालासो बिरांडे यांच्या ५१ रवे गुळाला प्रतिक्विंटल ७,०११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. हा गूळ व्यापारी शिवगोंडा सदलगे यांनी खरेदी केला.

यावेळी बाजार समितीचे सभापती प्रा. शेखर देसाई, उपसभापती पांडुरंग काशिद, ॲड. प्रकाश देसाई, भारत पाटील (भुयेकर), शंकर पाटील, संभाजी पाटील (पैलवान), सुयोग वाडकर, कुमार आहुजा, आकाराम केसरे (पैलवान), समितीचे सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील, जीवन जाधव, शाहूपुरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो पाटील (वडणगेकर), उपाध्यक्ष प्रवीण लिगाडे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT