मुदाळ तिट्टा : येथील वळणावर टेम्पोतून चौकीवरच घसरलेले लोखंडी चॅनल.   Pudhari File Photo
कोल्हापूर

मुदाळ तिट्टा येथे अपघातात दोन तरुणी थोडक्यात बचावल्या

वळणावर टेम्पोतील लोखंडी चॅनल घसरले; किरकोळ दुखापत

पुढारी वृत्तसेवा

बिद्री : मुदाळ तिट्टा येथे लोखंडी चॅनल घेऊन जाणार्‍या टेम्पोतून उतारावरील वळणावर चॅनेल घसरल्याने ‘एमएसएफ’च्या दोन तरुणी थोडक्यात बचावल्या.

निपाणी-देवगड महामार्गावरील फोंडा येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने येथील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी मुदाळ तिट्टा येथे रस्त्याच्या मध्यभागी निगराणीसाठी चौकी उभारण्यात आली. ही चौकी राधानगरी मार्गावरील वळणाच्या उतारावर आहे. सायंकाळी पाच वाजता टेम्पो (एमएच 09 इएम 4436) हा सरवडेकडून कोल्हापूरकडे वळला. यावेळी यातील लोखंडी चॅनल नीट बांधले नसल्याने वळणावर अचानक टेम्पोतून घसरले. या ठिकाणी सेवा बजावत असलेल्या समीक्षा देसाई (कराड) व श्रावणी जाधव (महे, बोरगाव) या दोघी सतर्क असल्यामुळे पटकन तेथून बाजूला गेल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, तरीदेखील समीक्षा हिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT