IPL Fan Park | कोल्हापुरात ‘आयपीएल फॅन पार्क’चा थरार आज-उद्या 
कोल्हापूर

IPL Fan Park | कोल्हापुरात ‘आयपीएल फॅन पार्क’चा थरार आज-उद्या

‘बीसीसीआय’, जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे मेरीवेदर मैदानावर आयोजन; सर्वांना मोफत प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘बीसीसीआय’ मान्यता प्राप्त टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे यंदा 19 वे वर्षे असून, दि. 28 मार्च ते 31 मे या कालावधीत भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील शहरांमध्ये स्पर्धेची रंगत सुरू आहे. प्रत्यक्ष मैदानावर जावून सामना न पाहणार्‍या क्रिकेटप्रेमींसाठी देशातील 50 शहरांमध्ये ‘बीसीसीआय’च्या वतीने ‘आयपीएल फॅन पार्क’ची व्यवस्था करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, सोलापूर, कोल्हापूर व रत्नागिरी या चार शहरांचा समावेश आहे. कोल्हापुरातील या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदा शनिवार (दि. 23) व रविवार (दि. 24) या कालावधीत दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत मेरीवेदर मैदानावर आयपीएल फॅन पार्कचा थरार रंगणार आहे.

भारतातील विविध 35 शहरांतून आतापर्यंत 4 लाख क्रिकेटप्रेमींनी हा आनंद लुटला आहे. कोल्हापूर बरोबरच तेलगंणा व आसाम या राज्यांतील वेगवेगळ्या शहरांत एकाच दिवशी व एकाचवेळी सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तीन सामन्यांचे 32*18 इंचाच्या भव्य एलईडी स्क्रीनवर थेट प्रेक्षपण केले जाणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधी अ‍ॅल्वीन गायकवाड व ‘केडीसीए’चे अभिजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.

दोन दिवसांत तीन सामने...

शनिवार दि. 23 मे सायंकाळी 7.30 वाजता,

लखनौ सुपर जायंटस् वि. पंजाब किंग्ज

रविवार दि.24 मे, दुपारी 3.30 वाजता,

मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स

सायंकाळी 7.30 वाजता,

दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स.

आयपीएल फॅन पार्कची वैशिष्टे

फॅन पार्कमध्ये सर्वांना मोफत प्रवेश

संपूर्ण मैदानावर कृत्रिम हिरवे कापडी अच्छादन

ओबी व्हॅनद्वारे थेट प्रेक्षपण

विविध करमणुकीचे व मनोरंजन, व्हरर्च्युएल क्रिकेट गेम

लकी ड्रॉ मार्फत टी शर्ट व आकर्षक बक्षिसे

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक सुविधा

खाद्य पदार्थांची विविधता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT