कोल्हापूर : पावसाळा संपून गणेशोत्सवापाठोपाठ आलेल्या दसरा आणि दिवाळीच्या सणांमुळे सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. सण-उत्सव म्हणजे नवी खरेदी! घरातील नवीन कपडे, गृहसजावटीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्ससह नवीन वाहने खरेदी करण्याचा आनंद कोल्हापूरकरांना एकाच ठिकाणी घेण्याची संधी दै. ‘पुढारी’तर्फे आयोजित व इनवेड ॲग्रो लिमिटेड प्रायोजित ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग आणि ऑटो फेस्टिव्हल २०२६’मध्ये उपलब्ध होत आहे.
शुक्रवार, दि. ९ रोजी व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी येथे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत उपस्थित राहणार आहेत. तसेच इनवेड ॲग्रो लिमिटेडचे संचालक विशाल जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून सकाळी १०.३० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.
शंभरहून अधिक स्टॉल्स; एकाच छताखाली समृद्ध बाजारपेठ
यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी १०० हून अधिक स्टॉल्स सज्ज असणार आहेत. यामध्ये गृहोपयोगी वस्तू, ग्रायंडर, रोटीमेकर, विविध प्रकारच्या अगरबत्ती, आटाचक्की, फॅशन गारमेंटस्, साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी काश्मिरी ड्रेसेस, आकर्षक डिझायनर ज्वेलरी, सौंदर्यप्रसाधने, चप्पल, शूज, इंटेरियर आणि होम केअर - हेल्थ केअर, रेडी टू इट प्रॉडक्टस् उपलब्ध असतील. याशिवाय चहा, मसाले, बेकरी उत्पादने, दिवाळी फराळ, आयुर्वेदिक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि हस्तकलेच्या नावीन्यपूर्ण वस्तूंची रेलचेल येथे पाहायला मिळणार आहे.
ऑटोमोबाईलचा स्वतंत्र भव्य विभाग
फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण म्हणजे नामांकित कंपन्यांच्या वाहनांचा स्वतंत्र विभाग. येथे चारचाकी, दुचाकी तसेच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना विविध शोरूम्सना स्वतंत्र फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. वेगवेगळ्या मॉडेल्सची तुलना, त्यांचे नवीन फीचर्स, मायलेज, ऑन रोड किमती आणि फेस्टिव्हल ऑफर्सची माहिती प्रत्यक्ष घेऊन प्रदर्शनाच्या ठिकाणीच वाहन बुक करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उत्सवाचा आनंद द्विगुणित करा!
उत्पादनांची मोठी व्हरायटी आणि अनेक वस्तूंवर मिळणारे आकर्षक डिस्काऊंटस् यामुळे हा फेस्टिव्हल कोल्हापूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. खरेदीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांनी कुटुंबीयांसह आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन,
कमला कॉलेजजवळ, राजारामपुरी, कोल्हापूर
दिनांक : ९ ते १३ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी १०.30 ते रात्री 9 वाजेपर्यंत
माहितीसाठी संपर्क - ९५४५३२७५४५, ८१४९५८२४४२