Post of Vice Chancellor | कुलगुरुपदासाठी 28 उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण 
कोल्हापूर

Post of Vice Chancellor | कुलगुरुपदासाठी 28 उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण

राज्यपाल यांच्याकडे गेलेल्या पाच नावांची शिक्षण वर्तृळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी 28 जणांच्या मुलाखतींची प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. कुलगुरू शोध निवड समिती कोणती पाच नावे राज्यपाल कार्यालयास पाठवली? याकडे शिक्षण वर्तृळाचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवाजी विद्यापीठ कुलगुरूंची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. मागील दोन दिवसांत मुंबईत 28 पात्र उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यात शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. आर. के. कामत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. आर. जी. सोनकवडे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. संजय ढोले, डॉ. अरुण खरात, डॉ. अशोक महाजन, डॉ. भगवान जोगी, डॉ. संजय कोळेकर, डॉ. मिलिंद उमेकर, डॉ. नितीन देसाई, डॉ. राजाराम माने, डॉ. राजेंद्र काकडे, डॉ. राजेंद्रसिंग देशमुख, डॉ. राजू गोची, डॉ. रवींद्र हेगडी, डॉ. संजय ढोले, डॉ. संजय चाकणे, डॉ. सतीश पाटील, डॉ. गणेशचंद्र शिंदे, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. स्मिता देशमुख, डॉ. सुरेंद्र मेहता, डॉ. शशिकांत वागे, डॉ. निखिल वाणी, डॉ. विजय खारे, डॉ. विलास नांदवडेकर यांचा समावेश आहे.

मुलाखतीमधून पाच पात्र उमदेवारांची नावे राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात आली आहेत. राज्यपाल पाच उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेतील. त्यानंतर एका उमेदवाराची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू कोण? याची उत्सुकता लागली आहे.

राज्यपाल कार्यालयाकडे अंतिम पाच उमेदवारांची नावे पाठविण्यात आली आहेत. यात शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. आर. के. कामत, डॉ. नितीन देसाई, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. आर. जी. सोनकवडे यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT