Indian wrestling team | रेश्मा मानेसह कुस्ती संघ आखाती देशात अडकला 
कोल्हापूर

Indian wrestling team | रेश्मा मानेसह कुस्ती संघ आखाती देशात अडकला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अ‍ॅल्बेनिया देशाची राजधानी तिराणा येथे दि. 25 फेब—ुवारी ते 1 मार्च या कालावधीत झालेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेसाठी गेलेला भारतीय महिला कुस्ती संघही आखाती देशातील युद्धामुळे अडकून पडला आहे. यामुळे खेळाडूंच्या घरच्यांना त्यांची काळजी लागून राहिली आहे. या संघात कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा अनिल माने (रा. वडणगे, ता. करवीर) यासह देशभरातील 14 कुस्तीपटू मुलींसह 18 जणांचा समावेश आहे.

सीनिअर रँकिंग सीरिज कुस्ती स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात रेश्मा माने हिच्यासह अपेक्षा, नेहा, मुशाकन, स्वीते पुष्पा, दीक्षा, निकिता, मंसी, कीर्ती, मंजीतारानी आणि काजल आदीं 14 मुलींसह प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक अशा एकूण 18 जणांचा समावेश आहे. ग्रीको रोमन, फ्रीस्टाईल प्रकारातील स्पर्धां खेळून हा संघ भारतात परतण्याच्या तयारीत असताना आखाती देशात सुरू झालेल्या युद्धामुळे तेथील विमान सेवा ठप्प झाल्याने भारतीय कुस्ती संघाला तिराणा येथे थांबावे लागले आहे. दरम्यान, मुलींच्या पालकांनी मोबाईलवरून संवाद साधून मुलींची विचारपूस केल्याची माहिती रेश्माचे वडील पै. अनिल माने यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT