कोल्हापूर : अ‍ॅपल हॉस्पिटलमध्ये नुकतेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचे उद्घाटनप्रसंगी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. श्रीया गाडवे, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. प्रतिभा भूपाळी, गीता आवटे, डॉ. किरण पाटणकर, डॉ. अशोक भूपाळी, डॉ. जाधव, डॉ. वैभव मुधाळे, डॉ. विजय पाटील. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : अ‍ॅपल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अ‍ॅपल हॉस्पिटलमध्ये नुकतेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचे उद्घाटन दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते झाले. या उपकरणामध्ये सिमेन्स गो टॉप कंपनीचे ड्युअल एनर्जी 128 स्लाईस स्पेक्ट्रल सिटी स्कॅन, इलेक्टा कंपनीचे फ्लेक्सेशन नावाचे 20 चॅनेल ब्रॅकी थेरपी मशिन आणि अ‍ॅबोटा कंपनीचे आधुनिक ओसीटी मशिन यांचा समावेश आहे. विशेषतः, ड्युअल एनर्जी 128 स्लाईस स्पेक्ट्रल सिटी हे दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव मशिन आहे.

यापूर्वी हॉस्पिटलने 1.5 टेस्ला एम.आर.आय. 64 स्लाईस सिटी स्कॅन, 48 चॅनेल 3 टेस्ला एम.आर. आय. डिजिटल फ्लॅट पॅनल कॅथलॅब व फिलिप्सची सिलिंग माऊंटेड अ‍ॅडव्हान्सड अझिरीयुऑन 7 उ 12 कॅथलॅब यासारखी उपकरणे कोल्हापूर व आसपासच्या जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहेत. ही उपकरणे उपलब्ध करून देऊन अ‍ॅपल हॉस्पिटलने आपली तीन दशकांची परंपरा कायम राखली आहे.

ड्युअल एनर्जी 128 स्लाईस स्पेक्ट्रल सिटी स्कॅन हे शरीराच्या आतील अचूक इमेजिंग करून गंभीर, हृदयातील ब्लॉकेज, गाऊट, किडनीस्टोन्स आजारांचे निदान करण्यासाठी वापरले जाणारे अत्याधुनिक मशिन आहे.

20 चॅनेल ब्रॅकी थेरपी मशिन : कॅन्सरवर योग्य ठिकाणी अचूक रेडिएशन उपचार देणारे यंत्र आहे, तर ओसीटी : अँजिओप्लास्टीनंतर स्टेंट योग्यरित्या बसला आहे का, हे तपासणारे अत्याधुनिक मशिन आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT