Kagal Municipality's Turtle Waterfall inaugurated |कागल नगरपालिकेच्या कासव धबधब्याचा लोकार्पण सोहळा  
कोल्हापूर

Kagal Municipality's Turtle Waterfall inaugurated |कागल नगरपालिकेच्या कासव धबधब्याचा लोकार्पण सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

कागल : कागल नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कै. व्ही. ए. घाटगे पर्यटन व नौकानयन केंद्र येथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या कासव धबधब्याचा लोकार्पण सोहळा व रिसॉर्टचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान पाझर तलावात उभारण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटनचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद घेतला. वंदे मातरम गीताच्या सुरांवर हवेत उडणार्‍या रंगीबेरंगी कारंजांनी उपस्थितांची मनं जिंकली. मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी ई-व्हेईकलमधून पादचारी मार्गाने जाऊन कासवाच्या प्रतिकृतीतील धबधब्याचे अनावरण केले. म्युझिकल फाऊंटनजवळ थांबून तलाव परिसरात विकसित केलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. पाझर तलावाचा पूर्वीचा व सध्याचा बदल, भविष्यातील नियोजन याबाबतची माहिती दर्शविणारी चित्रफीत दाखवली. चित्रफितीत स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाझर तलावाबाबत व्यक्त केलेले मत खरे ठरत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

यावेळी कागल नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा सौ. सविता माने यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमोल महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, छत्रपती शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंग घोरपडे, गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे, अखिलेश घाटगे, कृष्णराज महाडिक, बँकेचे माजी अध्यक्ष एम. पी. पाटील, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, दत्ता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT