सायझिंगमधील लिफ्ट अंगावर पडून शहापुरात महिलेचा मृत्यू 
कोल्हापूर

Ichalkaranji Lift Accident : सायझिंगमधील लिफ्ट अंगावर पडून शहापुरात महिलेचा मृत्यू

शहापूर पोलिस ठाण्यात

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : शहापूर येथे सायझिंगमध्ये स्वच्छता करणाऱ्या महिलेच्या अंगावर लिफ्ट पडल्याने तिचा मृत्यू झाला. पूजा राहुल चाबुकस्वार (25, रा. गौरीशंकरनगर तारदाळ) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. कृष्णा व्यास यांची शहापूरमधील लोटस पार्कमध्ये कृष्णा टेक्स्टाईल्स मिल नावाची सायझिंग आहे.

या सायझिंगमध्ये पूजा दीड वर्षापासून स्वच्छतेचे काम करीत होत्या. गुरुवारी गुढीपाडवा असल्यामुळे कामगार कामावर नव्हते. सकाळी 10 च्या सुमारास पूजा स्वच्छतेचे काम करीत असताना साहित्य इतरत्र हलवण्यासाठी वापरण्यात येत असलेली लिफ्ट अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला. वॉचमनने धाव घेतली असता लिफ्टखाली महिला अडकल्याचे निदर्शनास आले. जखमी पूजाला तातडीने इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना आयजीएम रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT