Husband Kills Wife | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून 
कोल्हापूर

Husband Kills Wife | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : चारित्र्याच्या संशयातून दगड व धारदार शस्त्राने हल्ला करून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. सायराबानू उमर पुळूजकर (वय 27, रा. बोर्गी, ता. जत. जि. सांगली) असे मृत विवाहितेचे नाव असून, पती उमर मैनुद्दीन पुळूजकर याला जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमर पुळूजकर याला पत्नी सायराबानू हिच्या चारित्र्यावर संशय होता. उमरने दानोळी येथील मामाकडे जायचे आहे, असे सांगून पत्नी सायराबानूला निमशिरगाव येथे आणले होते. गुरुवारी सायराबानू हिला निमशिरगाव येथे असलेल्या तुकाई डोंगरावर फिरण्याच्या बहाण्याने तो घेऊन गेला. तिथे उमरने सायराबानूच्या डोक्यात दगड घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला.

घटनेनंतर संशयित उमरने दानोळी येथे असलेल्या मामाला फोन करून पत्नीचा खून केल्याचे सांगितले. मामाने तातडीने निमशिरगावच्या पोलिसपाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसपाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांना पाचारण केले. पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलिस पथक तुकाई डोंगरावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोहोचले. रात्री उशिरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, हा खून चारित्र्याचा संशय घेऊन केल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना उमर याने दिली आहे. या दाम्पत्याला दोन मुले व तीन महिन्याची एक मुलगी आहे. खुनाची घटना समजतात निमशिरगाव व दानोळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT