हुपरी पोलिसांनी हरवलेले तब्बल १०० मोबाईल संच नागरिकांना परत दिले  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Police | हुपरी पोलिसांकडून १.५१ लाखांचे १०० हरवलेले मोबाईल नागरिकांना परत

हुपरी पोलीस ठाण्याकडे मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

Hupri Police 100 missing mobiles returned

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले तब्बल १०० मोबाईल संच नागरिकांना परत दिले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १ लाख ५१ हजार रुपये आहे.

हुपरी पोलीस ठाण्याकडे मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. तक्रारीतील मोबाईलचे IMEI क्रमांक एकत्रित करून CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधमोहीम राबवण्यात आली.

यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अपराजित जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT