गुडाळ : पुढारी वृत्तसेवा : वादळी वाऱ्याने गुडाळ (ता. राधानगरी) येथील विश्वास मारुती पाटील यांच्या राहत्या घरावर निलगिरीचे झाड कोसळल्याने घराची मोठी हानी झाल्याची दुर्घटना गुरुवारी (दि. २५) पहाटे घडली.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात गेले पंधरा दिवस अतिवृष्टी सुरू आहे. त्यातच गेले चार दिवस जोरदार वादळी वारे ही वाहत आहेत. गुरुवारी पहाटे विश्वास पाटील यांच्या घरामागे असलेले निलगिरीचे भले मोठे झाड घरावर पडल्याने छतावरील सिमेंट पत्रे, रूफ काम, बाथरूम दरवाजा आणि भिंतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या दुर्घटनेत ७० हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गाव कामगार तलाठी पी.आय. गुरव, कोतवाल कुमार कांबळे यांनी दुर्घटनेचा पंचनामा केला.