Honey Bee Attack News 
कोल्हापूर

Honey Bee Attack News | वेंगुर्ला - बेळगाव राज्यमार्गावर मधमाशांचा हल्ला, चंदगडचे पाच जण जखमी

चानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठी तारांबळ उडाली

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : वेंगुर्ला ते बेळगाव या राज्यमार्गावरील कल्लेहोळ फाटा (ता. बेळगाव) येथे हॉटेल व्हिलेज समोर अचानक आलेल्या मधमाश्यांच्या घोळक्याने राज्यमार्गावर ये - जा करणाऱ्या प्रवाशावर अचानकपणे हल्ला केल्याने प्रवाशांची भरदुपारी भंबेरी उडाली.

या घटनेत गवसे (ता. चंदगड) येथील पाच जण जखमी झाले. तर 15 हून अधिक दुचाकी प्रवासी व स्थानिक हॉटेलचे कर्मचारी तसेच जवळील टी स्टॉल मधील ग्राहकाला मधमाशांनी चावा घेतला. मंगळवारी (दि. 24) सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही घटना घडली.

कल्लेहोळ फाटा येथील हॉटेल व्हिलेज समोर हा प्रकार सुरू होता. यादरम्यान कल्लेहोळ फाटा येथे आपली दुचाकी पार्क करून बेळगावला दवाखान्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवासी बाबाजी राघो गिरी व रवी बाबाजी गिरी (रा. गवसे, ता. चंदगड) यांनाही मधमाशांनी चावा घेतला. तर हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याला मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना अंगावर गोधडी घालण्यासाठी गेलेले हॉटेलचे कर्मचारीही जखमी झाले.

याशिवाय जवळील माऊली हॉटेल मधील रामदुर्ग येथील एका ग्राहकालाही मधमाशांनी चावा घेतला. यापैकी अनेकांनी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठी तारांबळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT