kolhapur Crime News | दहशतीसाठी कंबरेला सत्तूर; सराईत गुंडास अटक  
कोल्हापूर

kolhapur Crime News | दहशतीसाठी कंबरेला सत्तूर; सराईत गुंडास अटक

राजारामपुरी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : परिसरात दहशत माजविण्यासाठी कंबरेला सत्तूर लावून फिरणाऱ्या सराईत गुंडास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. संकेत सुदेश व्हटकर (वय २८, रा. बिजली चौक, ढोर गल्ली, जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आयसोलेशन हॉस्‍पिटल परिसरात ही कारवाई केली.

पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुंड परिसरात दहशत माजविण्यासाठी कंबरेला सत्तूर लावून फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांना मिळाली होती. यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईची सूचना दिली. पथकाने आयसोलेशन परिसरातून संकेतला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला सत्तूर आढळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. पोलिस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, पोलिस अंमलदार अमोल पाटील, शाहू तळेकर, विशाल शिरगावकर, संदीप सावंत, सुशांत तळप यांनी ही कारवाई केली.

दोन मैत्रिणींचा वाद

संकेतच्या दोन मैत्रिणी आहेत. त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या दोघींनाही संकेतने मारहाण केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT