कोल्हापूर

Murgud-Akkalkot Hirakni Bus : मुरगुड-अक्कलकोट एसटीची हिरकणी बस सेवा लवकरच

backup backup

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या मुहूर्तावर मुरगुड व पंचक्रोशीतील प्रवासी जनतेच्या मागणीनुसार आदमापूर-पंढरपूर-अक्कलकोट अशी विविध तीर्थस्थळांची भेट घडवणारी मुरगुड-अक्कलकोट ही बस सेवा एसटीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुरगुड बस स्थानकावरून पहिल्यांदाच एसटीची हिरकणी (एशियाड) नावाची निम-आराम बस सेवा सुरू होत आहे. ही बस मुरगुड इथून सकाळी ९ वाजता निघून आदमापूर, कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, सोलापूर मार्गे अक्कलकोटला संध्याकाळी ५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात दुसऱ्या दिवशी सदर बस सकाळी अक्कलकोटहून ७:३० वाजता निघून सोलापूर, पंढरपूर, मिरज, कोल्हापूर, आदमापूर मार्गे मुरगूड इथे दुपारी ३:३० वाजता पोहोचेल. लवकरच या बसा शुभारंभ मुरगूड बस स्थानकावरून होत आहे.

विशेष म्हणजे शासनाने देऊ केलेल्या सर्व सवलती या बसेसला लागू आहेत. त्यामुळे ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ च्या दरम्यान चे ज्येष्ठ नागरिक व महिलांना व १२ वर्षा खालील लहान मुलांना तिकिटात ५० टक्के सवलत मिळणार आहे.

ही बस सुरू झाल्यामुळे मुरगूड आणि पंचक्रोशीतील नागरिकांना सहकुटुंब पंढरपुर, अक्कलकोट या धार्मिक तीर्थ स्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे. तसेच सोलापूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भाविकांना श्री संत बाळूमामाच्या दर्शनासाठी या बसने थेट श्रीक्षेत्र आदमापुर ला येणे शक्य होणार आहे.तरी या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

राज्य महामंडळाची मुरगुड आदमापूर अक्कलकोट हे नवीन हिरकणी बस सेवा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे या गाडीचा धावण्याचा व परत येण्याचा मार्ग आराखडा तयार करण्याचे काम करण्यात आले असून इतर बस पेक्षा तिकीट दर थोडा जादा असेल. अद्याप मार्ग फिक्स नसल्याने तिकीट दर लगेच सांगता येणार नाही आमचे हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गारगोटी आगारातून अक्कलकोट असेही बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती गारगोटी आगाराचे डेपो मॅनेजर टी.आर. नकाते यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT