गांधीनगर; पुढारी वृत्तसेवा : भरधाव दुचाकी रस्त्यावरून घसरल्याने पत्नीचा मृत्यू तर दुचाकीस्वार स्वतः आणि सासू हे गंभीर जखमी झाले. हर्षदा विकास कांबळे ( वय 26, रा. शाहूनगर, हुपरी, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव असून सुनीता सर्जेराव कुरणे (53, रा. तासगाव, ता. हातकणंगले) आणि विकास सुनील कांबळे (30, रा. हुपरी) अशी जखमींची नावे आहेत.
विकास सुनील कांबळे मोटारसायकल (एम एच 09 सी एन 4951) वरून पत्नी हर्षदा आणि सासू सुनीता कुरणे असे तिघेजण हुपरीहून कोल्हापूरला जात होते. सांगवडे फाट्याजवळ आले असता दुचाकी रस्त्यावरून घसरली. यावेळी हर्षदा या जोरात रस्त्यावर पडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विकास आणि सुनीता गंभीर जखमी झाले. याबाबतची फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात अरुण सुनील कांबळे (35, रा. हुपरी) यांनी दिली.