सतीश सरीकर
कोल्हापूर : उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपीच्या) प्रत्येक नंबर प्लेटला एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे. या प्लेटस् छेडछाड प्रतिरोधक वैशिष्ट्ये असल्याने वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट तयार करणे कमी होते. तसेच, वाहनांचा शोध घेणेही सोपे आहे. या नंबर प्लेटमुळे फसवणूक आणि बेकायदेशीर कामे कमी होऊन रस्त्यावरील सुरक्षितता वाढणार आहे. त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत.
एचएसआरपी नंबर प्लेटस् केवळ आकर्षक दिसण्यासाठी नसून त्यामागे गंभीर सुरक्षा कारणे आहेत. सध्या वाहन चोरीच्या अनेक घटना होतात. चोरट्यांकडून नंबर प्लेट बदलून ते वाहन वेगवेगळ्या गुन्ह्यात वापरले जाते. पोलिसांना तपास करणे अवघड जाते. मात्र, एचएसआरपी नंबर प्लेटमध्ये लेझर कोड, विशेष स्टिकर आणि सुरक्षा चिन्हे असल्यामुळे त्यात फेरफार करणे अशक्य आहे. यामुळे वाहन चोरीबरोबरच त्याचा गैरवापर होण्यावर प्रभावी अंकुश बसेल, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला.
वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेटसाठी अधिकृत वेबसाईटवर वाहन क्रमांक, इंजिन नंबर, चॅसिस नंबर आदी माहिती नोंद करावी लागते. शुल्क भरल्यानंतर संबंधित किऑस्कवर अपॉईंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसवून घेता येते. एचएसआरपी नंबर प्लेटमुळे वाहन ओळख पटविणे सोपे होणार आहे. प्रत्येक नंबर प्लेटवर छेडछाड-प्रतिरोधक स्टिकर तसेच आरएफआयडी टॅग असतो. या टॅगच्या माध्यमातून वाहनाचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहन चोरी करून गुन्हेगारांना पळ काढणे कठीण जाणार आहे. विशेषतः, दहशतवादी कारवाया किंवा ‘हिट अँड रन’सारख्या प्रकरणांमध्ये पोलिसांना तपास करण्यात मोठी मदत होणार आहे.
वाहन चोरीला प्रतिबंध : या नंबर प्लेसमुळे वाहनांची चोरी होण्यापासून संरक्षण मिळते. कारण, त्या बनवाट प्लेटस् तयार करण्यापासून रोखतात.
अद्वितीय ओळख : प्रत्येक नंबर प्लेटला एक अद्वितीय लेसर-ब—ँडेड ओळख क्रमांक आणि बारकोड असतो. त्यामुळे वाहनांचा शोध घेणे आणि त्यांची नोंद ठेवणे सोपे होते.
फसवणूक रोखते : या नंबर प्लेटमुळे बनावट नंबर प्लेट तयार करणे कठीण होते. त्यामुळे फसवणूक करणार्या गुन्हेगारी कारवाया कमी होतात.