High Profile Prostitution | हायप्रोफाईल वेश्या व्‍यवसायप्रकरणी ग्रुप ॲडमिनसह ७५० मेंबर्सना नोटिसा 
कोल्हापूर

High Profile Prostitution | हायप्रोफाईल वेश्या व्‍यवसायप्रकरणी ग्रुप ॲडमिनसह ७५० मेंबर्सना नोटिसा

मुंबई, बंगळूर कनेक्शन : सीडीआर, ऑनलाईन व्यवहार तपासणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : व्हॉटस्ॲ‌पद्वारे हाय प्रोफाईल वेश्या व्‍यवसायप्रकरणी पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढविली आहे. व्हॉटस्ॲ‌प ग्रुपमधील चार ॲडमिनसह ७५० मेबर्संना करवीर पोलिसांनी नोटिसा बजावल्याने कोल्हापूर, वाशीसह तालुक्यातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्‍यान, याचे मुंबई आणि बंगळूर कनेक्‍शन समोर आले असून सीडीआर, ऑनलाईन व्‍यवहाराचीही आता तपासणी होणार आहे.

वाशी (ता. करवीर) येथील ‘सनराईज लॉज’चा मालक शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील याच्या नावे चालविल्या जाणाऱ्या ‘सागर पाटील फ्रेंड सर्कल’ व्हॉटस्ॲ‌प ग्रुपमधील चौघा ॲडमिनसह ७५० मेबर्संना करवीर पोलिसांनी नोटिसा बजावल्याने कोल्हापूर, वाशीसह तालुक्यातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

हायप्रोफाईल वेश्या अड्डा; आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता

वाशी (ता. करवीर) येथील लॉजवर सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्‍या व्‍यवसाय ‘सागर पाटील फ्रेंड सर्कल’ या व्‍हॉटसॲप गुपच्‍या माध्‍यमातून चालवला जात होता. ग्रुपवर मुंबई, पुण्यासह कर्नाटकातील युवती, महिलांचे फोटो व्हायरल करण्यात येत होते. त्यानुसार दर ठरविणे, ऑनलाईन डिल करून ग्राहकांना मुली पुरवल्‍या जात होत्‍या, असे तपासातून समोर आले आहे.

अटकेत असलेले संशयित सागर कांबळे, कमलेश पाटील याच्या चौकशीतून अनेक बाबींचा उलगडा होत असल्याने पोलिस अधीक्षक निलोत्‍पल यांनी चौकशीची व्याप्ती वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. साखळीच्या संपर्कातील ग्रुप मेंबर्संचा छडा लावण्यासाठी मुख्य संशयित, त्याच्या सहकाऱ्यांशी झालेले ऑनलाईन व्यवहार, मोबाईल लोकेशनचीही वरिष्ठ स्तरावर माहितीचे काम सुरू आहे. व्हॉटसॲप ग्रुपद्वारे हायप्रोफाईल वेश्या अड्डाप्रकरणी आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, असे करवीरचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT