कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील पाच मैल रस्त्यावरील घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरने छापा टाकत 12 जणांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान 9,190 रुपये रोख रक्कम, 53,500 रुपये किमतीचे 10 मोबाईल हँडसेट आणि 60,000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 1,22,690 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमित पांडुरंग शिरोळे, अर्जुन लग्मान्ना पुजारी (वय 45), आप्पा लक्ष्मण धामणे (73), गौतम विजय शिंगे (29), राजकुमार रावसाहेब पाटील (35), तानाजी लक्ष्मण कुन्नुरे (50), सुदाम जनार्दन जाधव (76), धनंजय नागेश कांबळे (53), दत्ता शंकर शिरगन्नावर (37), नामदेव रामा गायकवाड (52), संतोष शिवाजी कुनुरे (44, नऊ जण रा. हेरवाड), प्रकाश गजानन गवंडी (52, रा. मजरेवाडी, ता. शिरोळ), मुरारी अण्णासो नरवाडे (40, रा. तेरवाड) अशी जुगार्यांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कुमार पाटील याच्या घरावर छापा टाकला. प्राथमिक चौकशीत अमित शिरोळे हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली आहे.