कोल्हापूर

कोल्हापुरात जोर वाढला; दोन धरण परिसरात अतिवृष्टी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मान्सूनचा जोर वाढत आहे. धरण क्षेत्रातही धुवाँधार पाऊस झाला असून रविवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंतच्या गेल्या दोन तासांत दोन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट दिला आहे. मंगळवारी ऑरेंज आणि बुधवारी यलो अलर्ट असल्याने तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

जिल्ह्यात गुरुवारी मान्सून दाखल झाला आहे. रविवारी सकाळपासून अनेक भागात तुरळक पाऊस सुरू होता. जिल्ह्याला शहर आणि परिसरात मात्र दिवसभर उघडीप राहिली. रविवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 32.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस हातकणंगले तालुक्यात 58 मि. मी. इतका झाला. भुदरगडमध्ये 41.4 मि.मी., कागलमध्ये 40 मि.मी., गगनबावड्यात 38.6 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 38.2 मि.मी., चंदगडमध्ये 34.2 मि.मी., शाहूवाडीत 31.7 मि.मी., राधानगरीत 27.2 मि.मी., आजर्‍यात 26.7 मि.मी., पन्हाळ्यात 21.7 मि.मी., करवीरमध्ये 20.8 मि.मी., तर शिरोळमध्ये 16.9 मि.मी. पाऊस झाला.

चार मंडल स्तरावर अतिवृष्टी

जिल्ह्यातील चार मंडल स्तरावर (सर्कल) गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे 96.3 मि.मी., रुई येथे 85 मि.मी., तर हुपरी येथे 78 मि.मी. पाऊस झाला. कागल तालुक्यातील खडकेवाडा येथे 67 मि.मी. पाऊस झाला. कागलमध्ये 64.3, गडहिंग्लज येथे 62.8, तर गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव परिसरातही 62.8 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. भुदरगड तालुक्यातील करडवाडी परिसरात 62.5 मि.मी. पाऊस झाला.

घटप्रभा, पाटगाव धरण परिसरातही अतिवृष्टी

जिल्ह्यातील बहुतांश सर्व धरण परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत घटप्रभा आणि पाटगाव धरण परिसरात अतिवृष्टी झाली. घटप्रभेच्या पाणलोट क्षेत्रात 71 मि.मी., तर पाटगावच्या पाणलोट क्षेत्रात 85 मि.मी. पाऊस झाला. वारणा धरण परिसरात 60 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीतही पाऊस सुरू झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 29 मि.मी. पावसाची नोंद झाली. तुळशीत 22 मि.मी., दूधगंगेत 27 मि.मी., कासारीत 35 मि.मी., कडवीत 50 मि.मी., कुंभीत 38 मि.मी., चिकोत्रात 58 मि.मी., चित्रीत 20 मि.मी., जंगमहट्टीत 40 मि.मी., तर कोदेत 62 मि.मी. पाऊस झाला.

SCROLL FOR NEXT