वाशिम मध्ये पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा File Photo
कोल्हापूर

Rain Update | येत्या २४ तासात राज्यातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आगामी २४ तास राज्यातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळाचा जोर कमी होताच बुधवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे.

(Rain Update)

गुजरात किनारपट्टीवर तयार झालेल्या असना या चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाने हजेरी लावली. सोमवारी (२ सप्टेंबर) राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र, चक्रीवादळाचा प्रभाव ओसरताच बुधवारपासून पाऊस कमी होत आहे.

मात्र जिल्ह्यात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. माजलगाव, वडवणी, गेवराई, परळी, अंबाजोगाई, धारुर, शिरूरसह इतर तालुक्यालाही या पावसाने झोडपून काढले आहे. बीड शहराजवळील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीने दाणादाण

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड या जिल्ह्यांत रविवारी पावसाने दाणादाण उडवून दिली. नदी- नाल्यांना पूर आला. हिंगोली, नांदेडमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

पावसामुळे नांदेडचा तेलंगणा, विदर्भाशी असणारा संपर्क तुटला असून शेतात पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन, केळीचे मोठे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना वगळता अन्य भागात गेल्या २४ तासांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.

ऐन पोळ्याच्या आदल्या दिवशीच पावसाचे झालेले आगमन सुखकारक वाटत असले तरी अतिमुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड जिल्ह्यात २६ मंडलांत अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने २६ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली तर विष्णुपुरी धरण पूर्णपणे भरल्याने धरणाचा एक दरवाजा उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. बीडचा बिंदुसरा प्रकल्प भरला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT