Gokul News File Photo
कोल्हापूर

Gokul Chairman Election | गोकुळ अध्यक्ष निवडीच्या याचिकेवर आज सुनावणी

महायुतीच्या संचालकांची न्यायालयातील भूमिका ठरणार निर्णायक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीची सभा कोरमअभावी तहकूब करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. २) सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणार्‍या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या आघाडीला १२, तर राजर्षी शाहू समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या. समविचारी आघाडीला बहुमत मिळूनही अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिले. कोरमसाठी आवश्यक असलेले १४ संचालकांचे संख्याबळ पूर्ण न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली. या निर्णयाविरोधात समविचारी आघाडीच्या संचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सर्किट बेंचचे न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती धीरज धोटे यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे. महायुतीच्या संचालकांनाही न्यायालयाने उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महायुतीचे संचालक न्यायालयात कोणती भूमिका मांडतात आणि त्यावर न्यायालय काय निर्णय देते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या सुनावणीच्या निकालावर गोकुळच्या अध्यक्ष निवडीची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT