Gokul Milk | अवसायन यादीतील दूध संस्थांची 7 एप्रिलपासून सुनावणी Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul Milk | अवसायन यादीतील दूध संस्थांची 7 एप्रिलपासून सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अवसायन यादीतील दूध संस्थांसह 1 हजार 320 दूध संस्थांची 8 एप्रिलपासून सुनावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात आजरा तालुक्यातील 80 संस्थांची सुनावणी होणार असून 40 संस्थांना नोटिसा पाठवल्या आहेत. आणखी 40 संस्थांना नोटिसा देण्यात येणार आहेत.

सहकार विभागाने 1320 दूध संस्था अवसायनात काढल्या आहेत. यापैकी गोकुळच्या 1108 संस्थांचा समावेश आहे. या संस्थांना मतदान प्रक्रियेपासून लांब ठेवण्याचा हा प्रकार असल्याने संचालक मंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी या संस्थांची माहिती घेऊन मगच कारवाई करावी, अशी मागणी दूध उत्पादक संस्थांसह संचालक मंडळाने केली आहे. या पार्श्वभूमीवर मालगावे यांनी या संस्थांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

अवसायन प्रक्रियेतील या सर्व संस्थांची सात एप्रिलपासून सुनावणी घेतली जाणार आहे. प्रत्येक संस्थेची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे मालगावे यांनी सांगितले. सात आणि आठ एप्रिल रोजी आजरा तालुक्यातील संस्थांची सुनावणी होईल. त्यासाठी 40 संस्थांना नोटीस पाठविली असून टप्प्याटप्प्याने नोटीस पाठवून सुनावणी घेतली जाणार आहे. एक महिन्यात ही सुनावणी पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT