Headphone ear damage | सावधान... हेडफोन, इयरफोनमुळे कानाला दणका! 
कोल्हापूर

Headphone ear damage | सावधान... हेडफोन, इयरफोनमुळे कानाला दणका!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : तुमचा हेडफोन, इयरफोन आजारांना निमंत्रण देतोय, असं सांगितले, तर अनेकांना विश्वास बसणार नाही; पण हेडफोन, इयरफोनच्या सततच्या वापरामुळे कानाचे आजार वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. हेडफोन, इयरफोनच्या वापरामुळे कानाच्या आजारांनी रुग्णालयात येणार्‍यांच्या संख्येत वाढली झाली आहे.

फोन आणि इतर गोष्टी हेडफोन, इयरफोन घालून ऐकली जातात. सीपीआरमधील कान-नाक घसा शास्त्रविभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी शाळा, कॉलेजमधील मुले सर्वात जास्त कानासंबंधी आजारांच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगितले.

हे टाळा

कानात काडी, टोकदार वस्तू, पेन किंवा चावी अशा वस्तू घालू नये. कानात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्या. अतिआवाजाच्या ठिकाणी कानांमध्ये कापसाच्या बोळ्याचा वापर करावा.

कानांची क्षमता

व्यक्ती 85 डेसिबलपर्यंत आवाज आठ तासांसाठी किंवा 100 डेसिबलचा आवाज 15 मिनिटांसाठी सहन करू शकते. यापेक्षा जास्त आवाज कानावर पडत राहिल्यास बहिरेपणा येऊ शकतो. एकमेकांशी साधला जाणारा संवाद हा 60 डेसिबल असतो. हेडफोनमुळे कानावर 105 डेसिबल आवाज पडत असतो.

सतत हेडफोन वापरणे धोक्याचे

तज्ज्ञांच्या मते हेडफोन किंवा इयरफोनचा आवाज मोठा असेल, तर कानाच्या पडद्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. अर्धा तास सलग याचा वापर केल्यास 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्यामुळे कानाला विश्रांती मिळेल आणि त्रास कमी होईल.

...यांनी घ्यावी विशेष काळजी

मधुमेह, उच्च रक्तदाब रुग्णांनी कानाचे आजार उद्भवल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांना हेडफोन, इयरफोनचा सततचा वापर बहिरेपणा आणि चक्कर येत असल्याचे दिसून आले आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT