Bribe case | पन्नास हजारांची लाच घेताना हेडकॉन्स्टेबलसह पंटरला अटक 
कोल्हापूर

Bribe case | पन्नास हजारांची लाच घेताना हेडकॉन्स्टेबलसह पंटरला अटक

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : भुदरगड पोलिस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल सुभाष आनंदा चौगुले (39) याच्यासह त्याचा पंटर मुस्तफा दस्तगीर शेख (41) यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पाटगाव येथील मौनीसागर जलाशयात बुडालेली गाडी परत मिळवून देण्यासाठी तसेच अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चौगुले यांनी संबंधित तक्रारदाराकडे सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागितली. पुढे ही रक्कम 50 हजारांवर निश्चित करण्यात आली. या प्रकाराबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने सापळा रचत सोनाळी येथील महसूल भवनासमोर कारवाई केली. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुस्तफा शेख याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात हेडकॉन्स्टेबल चौगुले यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT