मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Hasan Mushrif : महापालिकेत महायुतीचा धर्म पाळला नाही

मंत्री मुश्रीफ : भाजपने सत्ता वाटपाची जबाबदारी पाळावी; गोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेच्या सत्तावाटपात राष्ट्रवादी काँग््रेासला पद देण्यात आले नाही, याबद्दल राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी खंत व्यक्त केली. महापालिकेत राष्ट्रवादी काँग््रेासला पद देण्याची जबाबदारी भाजपची होती; मात्र त्यांनी ती पाळली नाही, हे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुश्रीफ बोलत होते. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा दावा जनसुराज्य पक्षाकडून मांडला जात असल्याचेही अनाकलनीय वाटत आहे. गेल्या चार दिवसांपासून गोकुळ, महापालिका आणि जिल्हा परिषद या तीन संस्थांभोवती जिल्ह्याचे राजकारण चांगलेच रंगले आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे महायुतीतील जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली; मात्र या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा सुटू शकला नाही. अखेर हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग््रेासचे नेते अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षावर दबाव वाढत असल्याचा संदेश जनतेमध्ये जात आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी अधिक संवेदनशीलता दाखविण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग््रेासच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. ज्या पक्षाच्या जागा जास्त असतात, त्या पक्षाला अध्यक्षपद देण्याची पद्धत आहे; मात्र मुंबईतील बैठकीत जनसुराज्य पक्षाने भाजपचा अध्यक्ष व्हावा यासाठी जोरदार मागणी केल्याचे दिसले, हे अनाकलनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. महापालिकेत राष्ट्रवादी काँग््रेासच्या चार जागा असूनही, तेथे महायुतीचा धर्म पाळला गेला नाही. आता जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा असूनही, अध्यक्षपदासाठी आम्हाला झुलविले जात आहे, हे योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT