मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Hasan Mushrif | आ. शिवाजी पाटील यांचे गैरसमज भेटल्यावर दूर करू

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महेश कदम हे सहायक निबंधक दुग्ध कधीच नव्हते. या दूध संस्थांची नोंदणी सहायक निबंधक गजेंद्र देशमुख आणि प्रदीप मालगावे यांच्या काळामध्ये झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात आमदार शिवाजी पाटील यांचे जे काही गैरसमज असतील ते त्यांची आणि माझी भेट झाल्यानंतर दूर करणार आहे. तसेच दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही समजून सांगणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

पत्रकात म्हटले आहे, गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेमधील महायुतीच्या नेत्यांची यासंदर्भात चर्चा झाली आहे. तसेच गोकुळ निवडणुकीबाबत आमदार पाटील यांच्यासोबत दोन वेळा चर्चा झाली आहे. तरीही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर गोकुळबाबत केलेली वक्तव्ये आश्चर्यचकित करायला लावणारी आहेत. त्यांची वक्तव्ये पाहून पाठीमागून त्यांना कुणीतरी चुकीचे प्रॉम्टिंग करत असल्यासारखे वाटते. त्यामुळे त्यांची आणि माझी भेट झाल्यानंतर त्यांच्या मनातील सर्व शंका-कुशंकांचे निरासरन होईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

...तर त्यांच्या मताधिक्यावर परिणाम

आ. पाटील यांनी करवीर, कागल आणि राधानगरी तालुक्यांचा उल्लेख केला आहे. यामुळे या तालुक्यातील सभासदांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. भविष्यात गोकुळ निवडणुकीत आ. पाटील जे उमेदवार देतील त्यांच्या मताधिक्यावर त्यांच्या वक्तव्यामुळे परिणाम होऊ शकतो, हे त्यांना समजून सांगणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

विनाकारण गैरसमज निर्माण होईल

गोकुळ सलग्न 1200 दूध संस्थांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तो आकडा 3700 सांगितल्यामुळे विनाकारण सभासदांमध्ये गैरसमज निर्माण होतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT