मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Hasan Mushrif : जि. प. अध्यक्ष महायुतीचाच; लवकरच निर्णय

मंत्री मुश्रीफ ः गोकुळ प्रकरणात न्याय मिळेल; गॅसटंचाईचा धोका लवकरच टळेल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड मंगळवारी (ता. 17) होणार आहे. महायुतीच्य तीनही पक्षांची लवकरच बैठक होऊन अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय होऊन अध्यक्ष महायुतीचाच होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. महानगरपालिकेतील नगरसेवक जास्त असणाऱ्या पक्षाचा महापौर त्याच धर्तीवर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचाही निर्णय व्हावा, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांच्या वक्तव्यावर मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग््रेासचे सर्व नेते, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे तसेच सर्व आमदार यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. सध्या सीआयडीकडून तपास सुरू असून, विमान प्राधिकरण संस्थेतर्फेही चौकशी सुरू आहे. लवकरच हा तपास सीबीआयकडे जाईल आणि जनतेच्या मनातील शंका दूर होतील. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग््रेास एकसंघ आहे. जिल्ह्यातील सर्व माजी आमदार व कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. असे सांगून त्यांच्या बळावर जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे येईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. गॅस तुटवड्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारने गॅसचा तुटवडा होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच इराणकडून भारताला सहकार्य मिळत असल्यामुळे लवकरच परिस्थिती सुरळीत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT