मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Hasan Mushrif | आ. सतेज पाटील यांच्‍याकडून गोकुळमधील विजयाचा उन्माद

मंत्री मुश्रीफ; मुख्‍यमंत्र्यांसह महायुती नेत्‍यांचा अपमान केल्‍याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : राजकारणात जय-पराजय होत असतात. विजयाचा जल्‍लोष असावा; पण उन्माद असू नये. विजयाच्या नशेत थेट मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्यापर्यंत मजल जाणे, हे आम्ही क्वचितच पाहिले आहे. आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमधील विजयाचा उन्‍माद केल्‍याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. तसेच सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्‍न आता केला, तरी महायुती सहकार्य करेल का, याची वेळ निघून गेली आहे. हा प्रयत्‍न त्यांनी यापूर्वीच करायला हवा होता,’ असेही मुश्रीफ यांनी सुनावले.

मंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी उच्‍च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांनी प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधला. तसेच मंत्री पाटील यांना दीपावलीच्‍या शुभेच्‍छा देण्‍यासाठी आलो आहे. येथे अन्‍य कोणतीही चर्चा झाली नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. ऊस दराच्‍या प्रश्‍नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर जबाबदारी सोपवली होती. गुरुवारी चर्चा, समन्वय आणि संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

गोकुळ निवडणुकीवरून आ. सतेज पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विजयाचा गवगवा केला. गोकुळ हा देशभरातील आणि राज्यभरातील नेत्यांपर्यंत नेण्याचा विषय नव्हता. मात्र, फेक सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विषय सर्वदूर पोहोचवण्यात आला. गोकुळमध्ये समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले आहेत. मात्र, संघाच्या पोटनियमानुसार सभेचा कोरम १४ संचालकांचा आहे. कोरम पूर्ण झाल्याशिवाय सभा होऊ शकत नाही आणि सभा झाल्याशिवाय अध्यक्षांची निवड होऊ शकत नाही. त्यांनी कोरम पूर्ण करावा आणि अध्यक्ष निवडावा, कोरमच्या तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेला डेडलॉक संपवण्यासाठीच सरकारने कायदा आणला आहे, असे स्पष्टीकरण त्‍यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT