Kothali Murder Case | हरिपूरच्या तरुणाचा कोथळीत खून  
कोल्हापूर

Kothali Murder Case | हरिपूरच्या तरुणाचा कोथळीत खून

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गळ्यावर वार; संशयित फरार

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : कोथळीत चारचाकी वाहन आडवे मारण्याच्या कारणातून विकास बाबूराव बोेंद्रे (वय ४५, रा. हरिपूर, ता. मिरज, जि. सांगली) यांचा सुर्‍याने गळ्यावर वार करून खून करण्‍यात आला. मंगळवारी रात्री साडेआठला ही घटना घडली. दरम्यान, संशयित हल्लेखोर आणि रेकॉर्डवरील गुन्‍हेगार अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (३६, रा. कोथळी, ता. शिरोळ) फरार झाला.

मंगळवारी रात्री विकास बोंद्रे हे हरिपूरकडे चारचाकी वाहनातून जात होते. यावेळी दुचाकीवरून संशयित अभी पाटील धडेल येत होता. यावेळी चारचाकी व दुचाकी वाहनामध्ये कट मारण्याची घटना घडली. बाचाबाची झाल्यानंतर धडेल याने जवळील सुरी काढून विकास बोंद्रे यांच्या गळ्यावर मारून वार करून पळून गेला. दरम्यान, बोंद्रे यांना मित्राने सांगली सिव्हिल रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्‍यू झाल्‍याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT