कोल्हापूर : रंकाळा परिसरातील हरिओमनगर येथील एका बंगल्याच्या तळघरात सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकला. 9 जुगार्‍यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Gambling den raid | हरिओमनगरला तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा; 9 ताब्यात

उच्चभ्रू वस्तीत खळबळ; 3.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील हरिओमनगर येथील गल्ली क्रमांक 15 मधील एका बंगल्याच्या तळघरात सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण, जुना राजवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून 9 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. संशयितांकडून 71 हजारांची रोकड, मोबाईल आणि दुचाकी, असा 3 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सूरज उदय चव्हाण (वय 39, रा. 13 वी गल्ली, राजारामपुरी), राजेंद्र सर्जेराव तावडे (31, रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा), संजय अंतू सावंत (46, रा. विक्रमनगर), अभिजित भानुदास ससे (44, रा. शनिवार पेठ), गणेश शिवाजी ढेरे (32, रा. रंकाळा टॉवर), विष्णू भिकाजी यादव (37, रा. कळंबे तर्फ कळे, ता. करवीर), योगेश धनाजी जाधव (47, रा. कुंभार गल्ली, शुक्रवार पेठ), धनंजय रामचंद्र माने (रा. नागराज गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), दीपक श्रीपती मोरे (34, रा. मु. पो. कूर, ता. भुदरगड) अशी ताब्यात घेतलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

संशयितांना राजवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून 71 हजार 210 रुपयांची रोकड, 1 लाख रुपये किमतीचे 9 मोबाईल, 2 लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी, असा 3 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रंकाळा तलाव परिसरातील पॉश आणि उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणार्‍या हरी ओमनगरमध्ये खुलेआम सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यामुळे परिसरातील नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT