कोल्‍हापूर : सोमवारी तामिळनाडूवरुन हापूस आंबा दाखल झाला.  
कोल्हापूर

Hapus Mangoes | बाजार समितीत आला तामिळनाडूवरुन हापूस आंबा

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये सोमवारी तामिळनाडूवरुन हापूस आंबा दाखल झाला. समितीमधील दस्‍तगीर बागवान यांच्‍या पेढीवर १२ नगाच्‍या ४० बॉक्‍सची आवक झाली. लिलावामध्‍ये प्रसाद वळंजू यांनी २५०० रुपये दराने प्रतिबॉक्‍सची खरेदी केली. दरम्यान कोकणातून रोपे नेत तामिळनाडूत केलेला हापूस आंब्‍याचा प्रयोग यशस्‍वी झाला आहे.

सिंधूदूर्गचा देवगड आणि रत्‍नागिरीचा रत्‍नागिरी हापूस आंबा जगप्रसिध्‍द आहे. मात्र आता कोकणातून हापूस आंब्‍याची रोपे नेेवून परराज्‍यासह परदेशातही आंब्‍याच्‍या बागांची लागवड केली जात आहे. तामिळनाडूमध्‍येही अशाच पध्‍दतीने कोकणातून काही वर्षांपुर्वी हापूस आंब्‍याची रोपे नेवून लागवड केली होती. या प्रयोगाला यश आले असून आता तामिळनाडूतून प्रतिवर्षी ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्‍यांत हापूस आंब्‍याची आवक होते.

डिसेंबरमध्‍ये आफ्रीकेवरुन येणार हापूस

तामिळनाडूप्रमाणेच दक्षिण अफ्रीकेमधील एका शेतकर्‍याने कोकणातून हापूस आंब्‍याची रोपे नेेवून लागवड केली होती. संबधित शेतकर्‍याच्‍या प्रयोगाला यश आले असून डिसेंबर व जानेवारी महिन्‍यात दक्षिण अफ्रीकेवरुनही भारतात हापूस आंब्‍याची आवक होवू लागली आहे. अफ्रीकेवरुन येणारा आंबा `मलावी` या नावाने ओळखला जातो.

तामिळनाडूहून कोल्‍हापूर बाजार समितीमध्‍ये आलेला हापूस आंबा हा उत्तम दर्जाचा आहे. तसेच द. अफ्रीकेवरुन येणारा हापूस आंबाही गुणवत्तापूर्ण आहे. हे प्रयोग यशस्‍वी झाल्‍यामुळे कोकणचा हंगाम वगळता ऑक्‍टोबर ते जानेवारी दरम्यानही बाजारपेठेत हापूस आंबा उपलब्‍ध होत आहे.
प्रसाद वळंजू, आंबा व्‍यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT