कोल्हापूर : चंबुखडी टाकीवर मॅनिफोल्ड बसविण्याच्या कामामुळे सोमवारी ए, बी, सी व डी वॉर्ड व लगतच्या उपनगरांना नियमित होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी (दि. 3) पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. टंचाई काळात उपलब्ध टँकरद्वारे महापालिका पाणीपुरवठा करणार आहे.
लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेचा काही भाग, संपूर्ण सी आणि डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, बह्मपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची टिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर टिकटी, देवल क्लब ई वॉर्डअंतर्गत खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहूपुरीतील 5वी ते 8वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक या सर्व परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.