Gym Trainer murder | जांभळीत जिम ट्रेनरचा खून; हल्लेखोर पसार 
कोल्हापूर

Gym Trainer murder | जांभळीत जिम ट्रेनरचा खून; हल्लेखोर पसार

घटनास्थळी चारचाकी वाहन, मोबाईल आढळला

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : जांभळी (ता. शिरोळ) येथील जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील (वय 44, रा. माळभाग) यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने हल्ला करून खून करण्यात आला. ही घटना जांभळी-जयसिंगपूर मार्गावरील कुरडे मळ्याजवळ बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. चरीत अडकल्याने चारचाकी वाहन व मोबाईल टाकून हल्लेखोर पसार झाले. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

जिम ट्रेनर संदीप पाटील हे दुचाकीवरून जांभळी येथून जयसिंगपूरकडे येत होते. कुरडे मळ्याजवळ आल्यानंतर संदीप यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने हल्ला करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जयसिंगपूरचे डीवायएसपी अमोल राठोड, जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, शिरोळचे पोलिस निरीक्षक खानापुरे यांच्यासह पोलिस पथक हल्लेखोरांचा शोध घेत होते. रात्री उशिरा पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. तसेच, हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT