कोल्हापूर : न्यू गुजरी मित्र मंडळाची दहीहंडी शिरोळच्या अजिंक्यतारा मंडळाने फोडली.  Pudhari File Photo
कोल्हापूर

Dahi Handi | गुजरीची दहीहंडी ‘अजिंक्यतारा’ने फोडली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पावसाच्या सरीमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि करमणुकीच्या जल्लोषात न्यू गुजरी मित्र मंडळाचा दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेकडो लोकांच्या उपस्थितीत सात थर रचत शिरोळच्या अजिंक्यतारा मंडळाने ही मानाची दहीहंडी फोडत एक लाखाचे बक्षीस पटकाविले. मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक किरण नकाते व भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा, माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्या हस्ते गोविंदा पथकाला बक्षीस देण्यात आले.

महाद्वार रोडवर भव्य स्टेज आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्त मुंबईतील आर.एस.के. ग्रुपचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पाच वाजल्यापासून गर्दी झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते व शंकर पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भरपावसातदेखील डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. मुंबईच्या आर. एस. के. ग्रुपच्या धमाल सादरीकरणाने वातावरण रंगून गेले. लोकप्रिय रिलस्टार नव्या कदम यांच्या उपस्थितीने तरुणाईचा उत्साह आणखी दुणावला.

यावेळी ‘कपिल शर्मा शो’ फेम ओक्साना हिने आपल्या खास शैलीत प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिरोळच्या अजिंक्यतारा मंडळाने थर रचण्यास सुरुवात केली. अजिंक्यताराने पहिले सहा थर रचले. दहीहंडीपर्यंत गोविंदा पोहोचला; परंतु हंडी फुटली नाही. त्यामुळे परत मंडळाने सात थर रचत मंडळाचा गोविंदा यश कुंभार यांनी दहीहंडी फोडली आणि उपस्थितांमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. उच्च तंत्र व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, गायत्री राऊत, सुहास लटोरे, भारत ओसवाल, प्रीतम ओसवाल, विजय हावळ आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. अमर नकाते, नियाज ननंदीकर, निखील कटके, संतोष घोगरे, नईन पटेल, सुशील बन्ने यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT