Child electric shock death | माझ्या बाळाची चिरफाड करू नका; सीपीआरमध्ये आईने फोडलेला टाहो मन हेलावणारा  File Photo
कोल्हापूर

Child electric shock death | माझ्या बाळाची चिरफाड करू नका; सीपीआरमध्ये आईने फोडलेला टाहो मन हेलावणारा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या अन्वीकच्या आईने ‘माझ्या बाळाची चिरफाड करू नका’, असा टाहो सीपीआरमध्ये फोडला. अडीच वर्षीय अन्वीकच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारत आई आरती जाधव यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करू नका, असा आक्रोश केला. आरती यांचा आक्रोश उपस्थितांचे मन हेलावणारा होता. त्यांच्या नातेवाईकांनीही उत्तरीय तपासणी न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सुमारे दोन तास सीपीआरमध्ये गोंधळ उडाला होता. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर रात्री दहा वाजता अन्वीकचा मृतदेह शेंडापार्क येथे उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला.

घोटवडे (ता. पन्हाळा) येथे संदीप वसंत जाधव त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. बुधवारी सायंकाळी त्यांचा मुलगा अन्वीक घराच्या दारात खेळत होता. खेळताना त्याचा विजेच्या वायरला स्पर्श झाला. यावेळी विजेच्या तीव— धक्क्यामुळे चिमकुल्या अन्वीकचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र डॉक्टरांनी अन्वीकला मृत घोषित केले. अन्वीकच्या मृत्यूचा धक्का त्याच्या आईला सहन न होणारा होता. त्यांचा सुमारे दोन तास सीपीआरमध्ये आक्रोश सुरू होता. आरती यांची अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.

पहिली मुलगी, त्यानंतर जुळे

आरती व संदीप यांना पहिली मुलगी झाली होती. त्यानंतर मुलगा व मुलगी असे जुळे झाले. मुलगा झाल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, बुधवारी मुलगा अन्वीक याचा विजेच्या धक्क्याने झालेला आकस्मिक मृत्यू जाधव कुटुंबीयांना न पटणारा होता. या घटनेने जाधव कुटुंबीयांवर दुखाचा डोंगरच कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT