कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी’ भवन येथील डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, कला,क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
खा. शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र मदणे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई आदींनी डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करत त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता (नगररचना विभाग) रमेश मस्कर, मोटर वाहन निरीक्षक ज्योती पाटील, सहा. मोटर वाहन निरीक्षक मारुत जाधव, डॉ. अजित लोकरे, डॉ. रणजित जाधव, क्रिडाईचे के. पी. खोत, गणेश सावंत, संदीप पवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे प्रदीप सकटे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. तुकाराम पाडेकर, सेक्रेटरी अॅड. मनोज पाटील, माणिक पाटील-चुयेकर, अॅड. धनंजय पठाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लाड, विशाल शिराळकर, सुनील लोहार, सचिन सुराणा, अरविंद वडगावकर, योगेश पाठक ,भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. दिलीप पवार, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, जयेश ओसवाल, पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमारे मोरे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे माजी अध्यक्ष रणजित पाटील, बंटी सावंत, माजी नगरसेवक सत्यजित कदम, राजसिंह शेळके, विजय सूर्यवंशी, ईश्वर परमार, किरण नकाते, अनिल कदम, अशोकराव भंडारे, माजी नगरसेविका रेखा आवळे, सर्वपक्षीय कृती समितीचे बाबा इंदूलकर, अनिल घाटगे, प्रमोद दाभाडे, अशोक पोवार, रमेश मोरे, रमेश पोवार, जहिदा मुजावर, ओंकार माने, पप्पू पांढरे, रमेश बिरांजे, अल्का वाघेला, पूजा साळोखे, माई वाडेकर, सुनीता राऊत, शीतल तिवडे, जब्बर मुल्ला, भास्कर कांबळे, संध्या भोसले, सुनील गाताडे, प्रमोद पोवार, संदीप कदम, मस्के, मनसेचे विजय करजगार, अमोल पाटील, रामदास पाटील, वैभव चोपडे, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे वसंतराव मगदूम, सुनील देसाई, सुरेखा पोर्लेकर, मुरलीधर राऊत, अवधून सकटे, किसन कल्याणकर, अॅड. उत्कर्ष भंडारे, शेखर पोवार, मेजर पी. एस. पोवार, दादासाहेब लाड, अविनाश चौगुले, डॉ. टी. एम. चौगुले, वसंत डावरे, रमेश पोवार, अनिल घाटगे, अॅड. सूरज भोसले, अॅड. संपत पवार, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. निखिल मुदगल, अॅड. स्नेहल गुरव, अॅड. विवेक पाटील, अॅड. शुभम पाटील, अॅड. शिवाजीराव खोत, दिलदार मुजावर, सचिन पाटील, कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, प्रदीप व्हरांबळे, दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, संजय लोखंडे, जयसिंग पाटेकर, नितीन राऊन, निवृत्त मोटर वाहन निरीक्षक पी. डी. सावंत, गणेश जाधव, रियाज कागदी, रमेश वडणगेकर, अरुण देवकुळे, जावेद बागवान, गणेश गर्दे, मधुकर माने, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते.