Tulsi Dam : तुळशी धरणाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तवंग Pudhari Photo
कोल्हापूर

Tulsi Dam : तुळशी धरणाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तवंग

मत्स्यपालनामुळे पाणी प्रदुषीत की अन्य कारणे, शोधण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

धामोड : रवींद्र पाटील

धामोड ता. राधानगरी येथील तुळशी धरणाच्या पाण्यावर हिरव्या रंगाचा शेवाळ सदृष्य तेलकट तवंग आला आहे. त्यामुळे पाणी प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याला मस्त्यपालन जबाबदार आहे, की इतर घटक हे आत्ताच शोधले नाहीत तर भविष्यात तुळशी नदीकाठच्या जनतेला पाणी प्रदुषणाला सामोरे जावे लागणार आहे. (Tulsi Dam)

तुळशी धरणामुळे धरणाचा परिसर व तुळशी नदीकाठ सुजलांम सुफलांम झाला आहे. गेल्या अठ्ठेचाळीस वर्षात या धरणातील पाण्यावर प्रदुषणाचा लवलेशही नव्हता. पण गेल्या दोन वर्षांपासून पाण्यावर हिरवट रंगाचा तेलकट तवंग येऊ लागला आहे. धरणामध्ये एका खासगी कंपनीचे मस्त्य पालन केंद्र असून, यातील संकरीत माशांना घालण्यात येणाऱ्या खाद्यामुळे पाणि प्रदुषीत होत असल्याचा आरोप स्थानीक नागरीक करत आहेत. तर संबंधित मस्त्यपालन केंद्राने मस्त्यपालनामुळे पाणी प्रदुषीत होत नसल्याचा दावा केला आहे. (Tulsi Dam)

वाढत्या प्रदुषणामुळे सर्वच घटकांवर प्रदुषणाचा विळखा घट्ट होत असुन, यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास तुळशी काठच्या राधानगरी व करविर तालुक्यातील बुरंबाळी, केळोशी खुर्द,  धामोड, लाडवाडी, जाधववाडी, कुरणेवाडी, चांदे, कोते, आरळे, घानवडे, घुंगुरवाडी, कांचनवाडी, म्हालसवडे, चाफोडी, शिरोली, आरे बिड पाटेकरवाडीसह सुमारे पन्नासहून अधिक गावांतील लाखो नागरीकांना पाणी प्रदुषणास सामोरे जावे लागणार आहे. यावर पाटबंधारे विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी तुळशी काठच्या सर्व गावांतून होत आहे. (Tulsi Dam)

यावर्षी धरण लवकर भरले असुन गेल्या विस दिवसात धरणातुन दोन टीएमसी पेक्षा जास्त पाणी सोडलेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊनही पाण्यावर शेवाळ सदृष्य तवंग येणे ही बाब गंभीर आहे.  याबाबत पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली असता शासनाकडून दर महिन्याला पाणी नमुने तपासले जातात व पाणी पिण्यासाठी उत्कृष्ट असल्याचे अहवाल येत असल्याची माहिती शाखा अभियंता अंजली कारेकर यांनी दिली आहे. (Tulsi Dam)

तुळशी धरणातील पाणी प्रदुषण रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी या परिसरातील सर्व ग्रामपंचायती मिळुन पाटबंधारे विभागाला लागणारे सहकार्य करू.

सौ माधवी विष्णु चौगले

सरपंच बुरंबाळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT