कोल्हापूर : सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपाला सोमवारी मध्यरात्री प्रारंभ झाला. सीपीआर आवारात निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित अनिल लवेकर, वसंत डावरे, रमेश भोसले, नितीन कांबळे आदी.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

kolhapur | सरकारी कर्मचार्‍यांसह शिक्षकांचा बेमुदत संप सुरू

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना त्वरित काढावी, या मुख्य मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी, शिक्षक सोमवारी (दि. 20) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. सीपीआर रुग्णालयाच्या आवारात निदर्शने करत संपाला सुरुवात झाली. जिल्ह्यात हा संप यशस्वी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

जिल्ह्यात शाळांत सध्या परीक्षा, निकाल आणि जनगणनेची कामे सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ज्या संघटनांची कामे तातडीची आहेत, त्यांना संपातून सवलत देण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा या संपात मोठा सहभाग राहील. मंगळवारपासून जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प होईल, असे समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी सांगितले.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता महावीर गार्डन येथे निदर्शने केली जाणार आहेत. संप कालावधीत याच ठिकाणी दररोज सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत सर्व कर्मचारी एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत.

शिस्तभंगाची कारवाई करणार : सरकारचा आदेश

संपाबाबत शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. संप कालावधीत कामकाज सुरळीत राहील, याकरिता विभागप्रमुखांनी मुख्यालय सोडू नये, असेही आदेश देत विविध सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT