कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेले दोन महिने दीड लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली स्थिरावलेल्या सोन्याच्या दरात आता तेजी सुरू झाली असून सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. शुक्रवारी (दि. ७) प्रति १० ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल ३,४०० रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो तब्बल ८,५०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली.
२४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५४,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर गुरुवारी हाच दर १ लाख ५१,३०० रुपये होता. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, २ लाख ३०,३०० रुपये प्रतिकिलो असणारी चांदी आता तब्बल २ लाख ३८,८०० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.