Gold Silver Price Drop | सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच  Pudhari
कोल्हापूर

Gold Silver Price Drop | सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच

सोने ४ हजार, चांदी ८ हजारांनी उतरली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सोने-चांदीच्या दरात बुधवारी (दि. २४) मोठी घसरण नोंदवण्यात आली. मंगळवारी (दि. २३) १ लाख ४९,००० रुपये असलेले सोने ४ हजारांच्या घसरणीसह १ लाख ४५,००० रुपयांवर, तर २ लाख ३४,००० रुपये असलेली चांदी ८ हजारांच्या घसरणीसह २ लाख २६,००० रुपयांवर आली आहे. हे दर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी आणि चांदी प्रति किलोसाठी (जीएसटीसह) आहेत.

जीएसटी वगळता सोन्याचा दर १,४०,७७७ रुपये, तर चांदीचा दर २,१९,४१७ रुपये प्रति किलो इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेली सुधारणा हे या घसरणीचे मुख्य कारण आहे. लग्नसराईचा हंगाम संपल्यामुळे मागणीत घट झाली असून, गुंतवणूकदारांकडून नफा वसुलीसाठी विक्री सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT