नामनिर्देशन अर्ज वाटप व स्वीकारणे : सकाळी ११.१५ ते ११.४५ वाजेपर्यंत.
अर्जांची छाननी : सकाळी ११.५० ते दुपारी १२.२० वाजेपर्यंत.
वैध अर्जांची यादी प्रसिद्ध : दुपारी १२.२५ वाजता.
उमेदवारी अर्ज माघारी : दुपारी १२.२५ ते १२.५५ वाजेपर्यंत.
अंतिम उमेदवारांची यादी : दुपारी १.१० वाजता.
मतदान प्रक्रिया : दुपारी १.२५ ते १.५५ वाजेपर्यंत.
मतमोजणी : दुपारी २ ते २.३० वाजेपर्यंत.
निकाल जाहीर : मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाणार आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने आपला उमेदवार उतरवला आहे. माजी आमदार राजेश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महायुतीकडून राजेश पाटील यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याने निवडणुकीतील समीकरणांना वेग आला आहे.
आता समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे.
त्यामुळे गोकुळच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच महायुतीकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
दुपारी साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.
गोकुळ दूध संघाच्या परिसरातील गोकुळ चौकात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान होणाऱ्या या सभेकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान समविचारी आघाडीच्या संचालकांनी तज्ज्ञ संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यापूर्वी त्याबाबतची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण झाली आहे का, असा मुद्दा आघाडीच्या संचालकांनी उपस्थित केला आहे.
संचालकांच्या मते, बैठकीसंदर्भातील नोटीस किमान सात दिवस आधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या वैधतेवर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
आता या आक्षेपावर पीठासीन अधिकारी मौसमी चौगुले काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयावर पुढील निवड प्रक्रियेचे चित्र अवलंबून राहणार आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता समविचारी आघाडीकडूनही उमेदवार उतरवण्यात आला आहे. शशिकांत पाटील चुयेकर यांनी आघाडीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महायुतीने यापूर्वीच राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर समविचारी आघाडीनेही उमेदवार जाहीर करत निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दोन्ही बाजूंकडून उमेदवार निश्चित झाल्याने गोकुळ अध्यक्षपदासाठी आता राजेश पाटील विरुद्ध शशिकांत पाटील चुयेकर अशी थेट लढत रंगणार आहे.
त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
गोकुळच्या नव्या अध्यक्षाची निवड आज होणार असल्याने कोल्हापुरातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात उत्सुकता वाढली आहे.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच महायुतीच्या समर्थकांकडून जल्लोष केला जात आहे.
अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे.
त्यामुळे गोकुळचा कारभार आता कोणाच्या हाती जाणार, याकडे दूध उत्पादकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवड सभेत वकिलांची उपस्थिती असणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांची अधिकृत परवानगी मिळाल्यानंतरच वकिलांना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे.
अध्यक्ष निवडीची संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार पार पडते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवड सभेत वकिलांची उपस्थिती असणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांची अधिकृत परवानगी मिळाल्यानंतरच वकिलांना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे.
अध्यक्ष निवडीची संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार पार पडते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायात मोठी मजल मारली आहे. दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री या तिन्ही क्षेत्रांत संघाचा विस्तार झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये गोकुळने ४१८५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. संघाच्या कामकाजाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
स्थापना : १६ मार्च १९६३ रोजी 'ऑपरेशन फ्लड' अंतर्गत गोकुळची स्थापना झाली.
विक्री उलाढाल : आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संघाने ४१८५ कोटी रुपयांची तात्पुरती उलाढाल केली.
दूध संकलन : २०२५-२६ या वर्षात तब्बल ६५.४० कोटी लिटर दुधाचे संकलन आणि प्रक्रिया करण्यात आली.
मुख्य डेअरी प्लांट : गोकुळकडे दररोज १७ लाख लिटर दूध हाताळण्याची क्षमता असलेला आधुनिक डेअरी प्रकल्प आहे.
उडगाव डेअरी : शिरोळ तालुक्यातील उडगाव येथे सॅटेलाइट डेअरीची सुविधा उपलब्ध आहे.
नवी मुंबई युनिट : नवी मुंबईत स्वतंत्र दूध पॅकिंग युनिट कार्यरत आहे.
शीतकरण केंद्रे : संघाच्या मालकीची चार शीतकरण केंद्रे असून त्यांची एकत्रित क्षमता दररोज ८ लाख लिटर इतकी आहे.
थेट दूध संकलन : बीएमसी युनिटच्या माध्यमातून ६१ ठिकाणांहून थेट दूध संकलित केले जाते.
या आकडेवारीवरून गोकुळचा विस्तार आणि दुग्ध व्यवसायातील मोठी व्याप्ती लक्षात येते. त्यामुळेच गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड ही केवळ पदाची निवड न राहता, हजारो दूध उत्पादक आणि कोट्यवधींच्या आर्थिक उलाढालीशी जोडलेली महत्त्वाची घडामोड आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांनुसार पार पडणार आहे. मतदानापासून मतमोजणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियमांचे पालन केले जाणार असून, संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जाईल.
या निवडीत एकूण २९ सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये निवडून आलेले २५ संचालक आणि शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या ४ सदस्यांचा समावेश आहे.
मतदानासाठी दोन स्वतंत्र मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडून आलेल्या २५ संचालकांची मते एका पेटीत, तर शासन नियुक्त चार सदस्यांची मते दुसऱ्या सीलबंद पेटीत ठेवली जाणार आहेत.
मतमोजणी करताना प्रथम २५ निर्वाचित सदस्यांच्या मतांचा विचार केला जाईल. या मतांमधून एखाद्या गटाला स्पष्ट बहुमत मिळाल्यास शासन नियुक्त चार सदस्यांच्या मतांची मोजणी केली जाणार नाही. मात्र, २५ मतांमध्ये समान मतांची स्थिती निर्माण झाल्यासच दुसरी सीलबंद मतपेटी उघडण्यात येईल.
दरम्यान, मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली तरी अंतिम निकालाबाबत २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीनंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
दुपारी १२.१५ वाजता वैध नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्यानंतर उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी दुपारी १२.२५ ते १२.५५ या वेळेत संधी दिली जाईल.
अखेर दुपारी १.१० वाजता अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जात आहे. दुपारी १२.२० वाजेपर्यंत ही छाननी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रियेतील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Gokul Milk Union President Election Results LIVE : कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडत आहे. या निवडणुकीत शशिकांत पाटील आणि रणजीतसिंह पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.
दरम्यान, मतदानापूर्वीच चार अतिरिक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून कायदेशीर वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या या चार संचालकांना मतदान करता येणार की नाही, हा प्रश्न न्यायालयात पोहोचला. अखेर औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला आहे.
उच्च न्यायालयाने नेमका काय दिला आदेश?
दिवाळीच्या सुट्टीत न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्यासमोर या प्रकरणाची तातडीने सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे चार अतिरिक्त संचालकांच्या मतदानाचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे.
मात्र, त्यांच्या मतदानाबाबत न्यायालयाने महत्त्वाची अट घातली आहे. या चारही संचालकांना मतदान करता येईल. पण त्यांनी दिलेली मते इतर मतांपासून वेगळी ठेवावी लागतील. त्यासाठी स्वतंत्र मतपेटी ठेवून ती सीलबंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.