‘गोकुळ’साठी आज ८२ उमेदवारी अर्ज दाखल 
कोल्हापूर

Gokul Election : ‘गोकुळ’साठी आज ८२ उमेदवारी अर्ज; आजअखेर ३०१ अर्ज दाखल

सर्वसाधारण गटातुनही 6 महिलांचे अर्ज

पुढारी वृत्तसेवा

आशिष ल.पाटील

गुडाळ : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व गटात मिळून एकूण 82 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखे अखेर सर्व गटात मिळून 301 अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शाहूवाडी तालुक्यात निर्णायक ठराव असलेल्या माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या कुटुंबातील माजी संचालिका अनुराधा पाटील यांच्यासह कुणीही अर्ज दाखल केलेला नाही.

आज अर्ज दाखल केलेल्या प्रमुखांमध्ये माजी आमदार सुजित मिणचेकर,जिपचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष अॅड. दत्ताजीराव राणे, अरुणराव इंगवले, जि प च्या सदस्या सुयशा घाटगे आदींचा समावेश आहे. सर्वसाधारण गटातून आज एकूण 33 व्यक्तींचे अर्ज दाखल झाले असून विशेष म्हणजे या गटातून 6 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अंजना रेडेकर, तेजस्विनी राहुल पाटील यांचा समावेश आहे. त्या शिवाय या गटातून 3 माजी संचालकांसह विश्वनाथ पाटील, रणजीत दिलीपराव पाटील, विश्वासराव इंगवले, सुशील पाटील कौलवकर आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय गटातून आज 13 व्यक्तींनी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये प्रामुख्याने अशोकराव चराटी, धीरज डोंगळे अभिषेक डोंगळे, सुहासिनी भांदिगरे आदींचा समावेश आहे.

विमुक्त भटक्या जाती मधून आज 9 व्यक्तींचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने कुरुंदवाड चे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, माजी संचालक विश्वासराव जाधव, बाबुराव रानगे( सावरवाडी ) युवराज गवळी आदींचा समावेश आहे. अनुसूचित जाती मतदार संघातून आज पाच व्यक्तींचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये माजी आमदार सुजित मिणचेकर आणि माजी संचालक नामदेव कांबळे यांचा समावेश आहे. महिला राखीव गटातून आज 22 महिलांनी अर्ज दाखल केले असून त्यामध्ये प्रामुख्याने माजी जि प सदस्या रेखादेवी माने पाटील,ज्योती पाटील, तेजस्विनी राहुल पाटील,आरती तायशेटे, स्निग्धा नरके, भाग्यश्री डोंगळे, डॉ. विनिता जयंत पाटील रोहिणीराजे माने पाटील आदींचा समावेश आहे. आता उद्या होणाऱ्या उमेदवारी अर्जाच्या छाननी कडे अर्जदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT