मंत्री हसन मुश्रीफ (File photo)
कोल्हापूर

Gokul issue | मुख्यमंत्री फडणवीस हे मुश्रीफ यांच्यासोबत; अस्वस्थ होऊ नका

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळमध्ये सध्या मतांची शक्ती नसलेले वादळ घोंगावत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या 35 वर्षांच्या राजकीय जीवनात अशी अनेक वादळे आली आणि त्यांनी ती संयमाने परतवून लावली आहेत. त्याचप्रमाणे हेही वादळ ते परतवून लावतील.

गोकुळसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री मुश्रीफ यांची अनेकवेळा चर्चा झाली आहे. मुख्यमंत्रीही मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसह घटक मित्रपक्षांच्या कार्यकत्यांनी अस्वस्थ होऊ नये, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

सहायक निबंधकांची बदली, 1100 अंतरिम अवसायनातील दूध संस्थांची सुनावणी, अंतरिम अवसायनात गेलेल्या दूध संस्थांचा निकाल, संस्थांच्या प्रलंबित सुनावणी, उच्च न्यायालयात असलेल्या तारखा, नवीन कायदा मंजूर झाल्यामुळे प्रशासक येणार का, या गोकुळसंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीसह घटक मित्र पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. मात्र, गोकुळच्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री आता मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ते कसल्याही संकटाचा सामना धीरोदात्तपणाने करतील. मंत्री मुश्रीफ यांची बाजू सत्याची आहे. त्यामुळे सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजीत नही, असे पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT