Gokul Milk Rate Hike | ‘गोकुळ’च्या गाय दूध विक्री दरात 2 रुपये वाढ Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul Milk Rate Hike | ‘गोकुळ’च्या गाय दूध विक्री दरात 2 रुपये वाढ

21 मेपासून दरवाढीची अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपये दरवाढ करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या प्रशासक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूरसह पुणे, मुंबई व कोकण विभागातील सर्व शहरांमध्ये दरवाढ केली आहे. गुरुवार, 21 मेपासून दरवाढीची अंमलबजावणी होईल. गाय दुधाच्या खरेदी दरात आणि म्हैस दुधाच्या खरेदी व विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात शनिवारी प्रशासक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळाची बैठक झाली. अमुल, मदर डेअरी यांनी दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत गोकुळही दूध विक्री दरात वाढ करणार का, याकडे लक्ष होते; मात्र प्रशासकांनी केवळ गाय दूध विक्री दरात वाढ केली असून म्हैस दुधाचे दर ‘जैसे थे’ ठेवत ग्राहकांना दिलासा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT