Milk Price Hike Pudhari
कोल्हापूर

Buffalo milk price hike: गोकुळच्या म्हैस दूध खरेदी दरात एक, विक्री दरात दोन रुपये वाढ

आजपासून दरवाढ लागू : संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय; गाय दूध खरेदी दरातही दोन रुपयांची वाढ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये तर म्हैस दूध खरेदी प्रतिलिटर एक रुपये आणि विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली. संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. ही दरवाढ शनिवार, दि. 21 पासून लागू होणार आहे, अशी माहिती चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.

गोकुळ संलग्न असलेल्या 7500 प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून प्रतिदिन सुमारे 17 लाख लिटर दूध संकलन करते. गोकुळला 25 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि बाजारातील सद्य:स्थितीचा आढावा घेता दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

नवीन दरवाढीनुसार म्हैस दुधास 6.0 फॅट आणि 9.0 एसएनएनसाठी 53.50 रुपये तर गाय दुधास 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफसाठी प्रतिलटर 36 रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना महिन्याला सुमारे साडेसात कोटी रुपये ज्यादा मिळणार आहेत.

मुंबई, पुण्यातही विक्री दरात वाढ

गोकुळने कोल्हापूरसह मुंबई, पुण्यातही दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. त्यानुसार कोल्हापूरमधील सुधारित विक्री दर प्रतिलिटर 70 रुपये तर मुंबई आणि पुणे येथील विक्री दर प्रतिलिटर 76 रुपये असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT