Gokul Election | समविचारी आघाडीच्‍या पॅनेलची आज घोषणा 
कोल्हापूर

Gokul Election | समविचारी आघाडीच्‍या पॅनेलची आज घोषणा

आ. सतेज पाटील करणार उमेदवार जाहीर : २१ उमेदवार होणार निश्‍चित

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, गोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी छ. शाहू समविचारी आघाडीच्‍या पॅनेलची आज घोषणा होणार आहे. आघाडीचे नेते काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील सायंकाळी ५ वाजण्‍याच्‍या सुमारास उमेदवारांची नावे घोषित करणार आहेत.

‘गोकुळ’साठी महायुती विरुद्ध आ. सतेज पाटील यांच्‍या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीमध्‍ये दुरंगी लढत रंगणार आहे. राष्‍ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाचा समावेश असलेल्‍या महायुतीच्‍या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे तगडे आव्‍हान आ. सतेज पाटील यांच्‍या समविचारी आघाडीसमोर असणार आहे. आ. पाटील यांचे पॅनेल तयार असून, आज ते पॅनेलची अधिकृत घोषणा करणार आहेत. सध्‍या पॅनेलचे सर्व उमेदवार ठरले असले, तरी अंतिम क्षणी काही नावे बदलण्‍याची शक्‍यता आहे.

समविचारी आघाडीचे पॅनेल तयार असले तरी चार जागा प्रलंबित ठेवल्‍या आहेत. महायुतीमधील नाराज उमेदवार कोणी गळाला लागतय का हे पाहून अंतिम चार उमेदवार आज निश्‍चित केले जाणार असल्‍याचे समजते.

समविचारी आघाडीचे संभाव्‍य उमेदवार

सर्वसाधारण : बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजित तायशेटे, विकास पाटील, रामराजे कुपेकर, विद्याधर गुरबे, सत्‍यजित पाटील, विश्‍वजित रणजितसिंह पाटील, भिमगोंड बोरगावे, विश्‍वजित दिनकरराव जाधव, विशाल गोपाळराव पाटील, सचिन घोरपडे, मोहन धुंदरे, उदय पाटील, बाबासाहेब देवकर, रणधीर मोरे.

महिला राखीव : अंजना रेडेकर, भाग्‍यश्री डोंगळे,

अनुसूचित जाती : माजी आ. राजू आवळे,

भटके विमुक्‍त : बयाजी शेकळे

इतर मागास : शशिकांत खोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT