आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने घेतली मुसंडी दोघांमध्ये कांटे की टक्कर दिसून येत आहे.
आतापर्यंत सर्वसाधारण गटातील १६५० मतदानांची मोजणी पूर्ण झाली असून दुसऱ्या फेरीत देखील क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याचं अनेकांना धक्का बसला आहे. असं असलं तरी महायुतीचे सर्वच उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर आहेत.
सुरूवातीला ८२५ मतांची मोजणी पूर्ण झाली असून सध्या तरी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार देखील आघाडीवर असून हा कल पुढे कसा येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सोलापूरमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गोकुळमध्ये २५ च्या २५ जागा आमच्याच निवडून येतील असा विश्वास बोलून दाखवला. सुरूवातीचे कल आमच्या बाजूने असून कप बशी जोरात आहे असंही ते म्हणाले.
यंदाच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं आहे. सर्वसाधारण गटासह इतर पाच गटात देखील क्रॉस वोटिंग झाल्याने यंदा काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.
'गोकुळ' मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. गुलाल उधळणे, फटाके फोडून जल्लोष करणे, दुचाकींचे सायलेन्सर काढणे, साऊंड सिस्टीम लावून हुल्लडबाजी करताना आढळल्यास थेट कारवाईचा इशारा पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिला आहे.
यंदा गोकुळच्या निवडणुकीसाठी 10 तालुक्यात चुरशीने १०० टक्के मतदान झालं आहे.
कोल्हापूर सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि विधानसभा निवडणुकीवर देखील प्रभाव टाकरणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. यंदाची निवडणूक विशेष करून जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते विरूद्ध सतेज पाटील अशी झाली. आज जिल्ह्यातील ठरावधारक कोणाच्या बाजूने मतदान करणार याचा निकाल लागणार आहे. २५ संचालकांपैकी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी अन् राजर्षी शाहू समविचारी आघाडी यांच्या किती सीट बसतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या गोकुळच्या निवडणुकीसाठी ९९.९६ टक्के मतदान झाले आहे. प्रचारावेळी विविध देवांचा आंगारा अन् शपथा यांचा देखील सहारा घेण्यात आला होता. त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागले आहे.