Gokul Election |  
कोल्हापूर

Gokul Election : 'गोकूळ' च्या अंतिम मतदार यादीत ५३३२ संस्था

आणखी १६ संस्‍था वाढण्‍याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. यादीमध्‍ये ५३३२ संस्‍था सभासदांचा समावेश आहे. यादीत ५३४८ संस्‍थांचा समावेश असला पाहिजे, असा दावा गोकुळच्‍या माजी संचालकांनी केला आहे. त्‍यामुळे यादीत आणखी १६ संस्‍था वाढण्‍याची शक्‍यता आहे. विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांनी यादी प्रसिद्ध केली.

गोकुळची निवडणुक प्रक्रिया सुरू असून गोकुळने ५४७० संस्‍था सभासदांची यादी सादर केली होती, तर विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांनी ४८९७ संस्‍थांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. प्रारूप यादीत अवसायनातील ४९२ दूध संस्‍था वगळण्‍यात आल्‍या होत्‍या; मात्र गुरुवारी कोल्‍हापूर सर्किट बेंचने या संस्‍था पात्र ठरविल्‍याने या संस्‍थांचा यादीत समावेश केला आहे.

१२२ संस्‍था निवडणुकीस अपात्र

गोकुळने ५४७० संस्‍थांची यादी सादर केली होती. यापैकी ५३४८ संस्‍था अंतिम मतदार यादीत राहतील. त्‍यानुसार गोकुळने सादर केलेल्‍या यादीतील १२२ दूध संस्‍था निवडणुकीस अपात्र ठरल्‍या आहेत. अपात्र ठरलेल्‍या १२२ संस्‍थांपैकी ३१ संस्‍थांनी ठरावच दाखल केलेला नाही, तर ९१ संस्‍था या नोंदणी रद्द झालेल्‍या आहेत. कार्यालयीन वेळ संपत आली तरी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली नसल्‍यामुळे माजी संचालक, संस्‍था प्रतिनिधी यांनी सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी माजी संचालक नविद मुश्रीफ, विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, किसन चौगले, अजित नरके, बाळासाहेब खाडे आदी उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT