Gokul Dudh Sangh Inquiry Case | आत आहेत, त्यांना बाहेर काढा; आम्हालाही बोलायचे आहे 
कोल्हापूर

Gokul Dudh Sangh Inquiry Case | आत आहेत, त्यांना बाहेर काढा; आम्हालाही बोलायचे आहे

सहा. निबंधक कार्यालयात दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आम्हालाही साहेबांची भेट घ्यायची आहे, भूमिका मांडायची आहे. आत आहेत त्यांना बाहेर काढा, अशी भूमिका घेत दूध प्रतिनिधींनी सहायक निबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आत सोडण्यासाठी वाद घातल्यने तणाव निर्माण झाला. सोमवारी दूध संस्था चौकशीवेळी हा प्रकर घडला.

दरम्यान, यावेळी तक्रारदार प्रकाश बेलवाडे त्यांची भूमिका सहा. निबंधक सुजय कदम यांच्यासमोर मांडत होते. याचवेळी येथे आलेल्या दूध संस्था प्रतिनिधी कार्यालयात जाण्यावरून आक्रमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

दूध संस्थांचे प्रतिनिधीही कदम यांना भेटण्यासाठी आले होते. ते काही काळ कार्यालयाबाहेर थांबून होते. थोड्या वेळाने सर्व प्रतिनिधी कदम यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. त्यांनी आम्हालाही आत प्रवेश द्या, अशी आक्रमक भूमिका घेतली. बेलवाडे त्यांची भूमिका मांडून कार्यालयातून निघून गेले व संस्था प्रतिनिधी कार्यालयात आले. यामुळे येथील वातावरण निवळले. यावेळी केर्लेचे युवराज तिबिले, प्रयाग चिखलीचे भूषण पाटील, करंजफेणचे अनुप वाघारे, मरळीचे विलास पाटील आदींसह जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिनिधींनी कोणा एकट्याच्या तक्रारीवरून 1200 दूध संस्थांना वेठीस धरू नये. या दूध संस्था कित्येक वर्षांपासून गोकुळला दूध पुरवठा करत आहेत. दूध संस्थांना न्याय द्या. गोकुळची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करा, अशी मागणी प्रतिनिधींनी केली. यावर कदम यांनी म्हणणे जाणून घेतले जाईल. त्यानंतरच निर्णय होईल, असे आश्वासन दिल्यानंतर संस्था प्रतिनिधी निघून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT